राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतांना राज्य सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. यापार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मंडळी मदतीचा हात पुढे करत आहे. दुष्काळग्रस्त आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकर घेतला होता. परंतु, त्यांच्या मदतीला आता व्यापक स्वरुप देण्यात आले असून जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी ‘नाम फांऊण्डेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. नाम फाऊण्डेशनच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशातून दुष्काळी भागातील तरुणांना कायमस्वरुपी रोजगार देण्यासाठी काम होणार असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितलं.
पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जाऊन नाना पाटेकर यांनी मंगळवारी ‘नाम’ या संस्थेची नोंदणी केली. एस.बी.आय. बँकेत खाते उघडण्यात आले असून स्वत: नाना पाटेकर यांनी प्रसारमाध्यमांद्वारे बँकेचा खातेक्रमांक जाहीर केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा