नारायणगाव : नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यापैकी तिघांकडे आधार कार्ड व रहिवाशी दाखला नारायणगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे . यापैकी एका बांगलादेशी नागरिकाचे नाव नारायणगाव ग्रामपंचायतच्या मतदार यादी मध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील गुन्हे शाखेने आठ बांगलादेशी मजुरांना ताब्यात घेतले आहे .हे नागरिक अवैधरित्या भारतात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .या आठपैकी अलीम सुआन खान मंडल वय ३२, अलअमीन अमिनूर शेख वय २१ व मोसिन मौफिजुल मुल्ला वय २२ यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवाशी दाखला मिळून आला आहे . या पत्त्याच्या आधारे या बांगलादेशींनी आधार कार्ड काढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दाखला नारायणगाव ग्रामपंचायत मधून कोणी दिला याबाबत नाशिक पोलीस चौकशी करीत आहेत . या चौकशीत बांगलादेशी नागरिक अलामीन अमीनूर शेख यांचे नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार यादीत नाव आढळून आले आहे . त्यांचे मतदान कार्ड (AFB ८९०७६६९) क्रमांकाचे असल्याचे आढळून आले आहे .
काल दि ०८ नाशिक गुन्हे शाखेच्या पथक पोलीस उप निरीक्षक मयूर निकम व ३ पोलीस अंमलदार यांनी नारायणगाव येथे राहत असलेल्या व पथकाच्या ताब्यात असलेले अलीम सुआन खान मंडल व अलअमीन अमिनूर शेख याना घेऊन नारायणगाव येथे तपासकारण्यासाठी आले होते . ते दोघे हि बांगलादेशी नागरिक वॉर्ड क्र ४ मधील बीएसएनल कार्यालयासमोरील एका बिल्डिंग मध्ये राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये स्वयंघोषणापत्र व आधार कार्ड नंबर घेतल्याशिवाय रहिवासी दाखले दिले जात नाही . त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना रहिवासी दाखले कोणी व कधी दिले याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे . याबाबत कोणी कर्मचारी अथवा नागरिक दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पाटे यांनी दिली.
या बांगलादेशी नागरिकाचे नारायणगाव मतदार यादीत नाव कसे आले व कोणी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट केले आहे याची चौकशी करण्याची मागणी नारायणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गट अध्यक्ष गणेश वाजगे व माजी ग्रामपंचात सदस्य रामदास अभंग यांनी तालुका प्रशासन कडे केली आहे.
(नारायणगाव येथील ग्रामपंचायत मतदार यादीत बांगलादेशी नागरिक अलामीन अमीनूर शेख यांचे प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार यादीत नाव आढळून आले आहे.)