पुणे : गौतम अदानी यांना काँग्रेसने मोठे केले, असे भारतीय जनता पक्ष म्हणतो, मात्र तसे असेल तर गेल्या ५० वर्षांत अदानी कुठे होते आणि गेल्या आठ-नऊ वर्षांतच ते प्रकाशझोतात का आले, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानींबाबत प्रश्न उपस्थित केले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानटपरीवर बोलत असल्यासारखे भाषण केले. अदानी एवढे सज्जन आहेत तर पंतप्रधान काहीच बोलत का नाहीत, अशी विचारणा नाना पटोले यांनी शनिवारी केली.
हेही वाचा – ‘आम्ही दाबणार ‘नोटा’; पुण्याच्या कसब्यातील फलकाची शहरात चर्चा
हेही वाचा – खराडी भागात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांविरुद्ध गुन्हा
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकींच्या प्रचारासाठी, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यासह देशातील विविध घडामोडींवर पटोले यांनी आपले मत व्यक्त केले.