कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येणार आहे. यातून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याच दिसत आहे. त्यामुळे ते येत आहे. आता येथील भाजपाच्या नेत्यांच काही चालणार नाही, अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका केली.
हेही वाचा- “राज्यात गद्दारी करून आलेल्या सरकारला घरी बसवण्याचं काम शिक्षकांनी केलं”; अजित पवारांची टीका
कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली.यावेळी आमदार चेतन तुपे,आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित होते.
हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडी, भाजपा आणि अपक्ष उमेदवाराने फोडला प्रचाराचा नारळ
यावेळी नाना पटोले म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. लोक वेडे झाले म्हणून शाई फेकली का ? त्या घटनेच आम्ही कोणीच समर्थन केल नाही आणि करणार देखील नाही. पालकमंत्री पदावर राहून महापुरुषांचा अपमान केला. ही चीड लोकांमध्ये का निर्माण झाली. याबाबतची कारण शोधली पाहिजे, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांनी दिला.
हेही वाचा- कसबा विधानसभा पोटनिवडणूक : अजित पवार यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
देशातील अत्याचारी हुकुमशाही इंग्रज राजवटीला हकालण्याचा मनसुबा येथे झाला होता. आज देखील देशात त्याच प्रकारच हुकुमशाहीच सरकार आहे. संविधान आणि लोकशाही संपविण्यास निघाले आहे. हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन या विचाराविरोधात काढले पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.