पुणे: मागील काही दिवसापूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरू होती. ती चर्चा थांबत नाही तोवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधीदेखील पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यात काँग्रेस पक्षाची पाश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रियांका गांधी पुणे लोकसभा निवडणुक लढणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला असता त्यांनी, आपण त्यांना पत्र पाठवून द्या अशी मिश्किलपणे टिप्पणी करताच एकच हशा पिकला. तर याबाबत हाय कमांड निर्णय घेईल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच यावेळी नाना पटोले म्हणाले की,आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेऊन विभागीय निहाय बैठका आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हाला आगामी निवडणुकीत यश निश्चित मिळेल. त्याच बरोबर आम्ही जागावाटपासंदर्भात मेरिटनुसार निर्णय घेणार असून पश्चिम महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले

तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुक होत नाही. राज्य सरकार आणि प्रशासक कारभार पाहत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. पण आगामी निवडणुका कधी ही झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारला जनता निश्चित जागा दाखवेल, तर राहुल गांधींना भाजप रावण म्हणून उल्लेख करत आहे. पण महागाई, बेरोजगारी कुणी वाढवली. तर रावण प्रवृत्तीच्या केंद्र आणि राज्य सरकारने वाढवली आहे. त्यामुळे या रावण प्रवृत्तीच्या सरकाराच दहन करायचं आहे. अशा शब्दात केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole open up on will priyanka gandhi contest in pune lok sabha election svk 88 mrj
Show comments