पुणे : Narayan Rane vs Uddhav thackrey “ठाकरे काय राहिले आहे?” आता ठाकरे संपले. ठाकरेंचं काही राहील नसून मातोश्री राहिले आहे. यापूर्वी ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते.त्यावेळी ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे पुणे दौर्‍यावर होते. 

प्रसार माध्यमांशी बोलतांना काही विषयांवर मते व्यक्त करतांना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.  खासदार नवनीत राणा यांचे हिंदू शेरनी अशा आशयाचे फलक लागले आहेत. यातून ठाकरे गटाला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नारायण राणे म्हणाले की, पुणे शहराबाबत अनेक प्रश्न आहेत. ठाकरे गट,मातोश्री एवढाच महाराष्ट्र आणि भारत आहे का असा सवाल उपस्थित केला.

Story img Loader