कात्रज भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचे एक किलो २१ ग्रॅम चरस, मोबाइल संच असा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे: एसटी स्थानकांच्या आवारात दलालांची ‘घुसखोरी’; चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी सर्फराज मुजफ्फर खान (वय ३५, रा. साईसदन अपार्टमेंट, मांगडेवाडी, कात्रज, मूळ रा. मोहिते काॅलनी, कदमवाडी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली. खान याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. मांगडेवाडी परिसरात एक जण चरस विक्रीसाठी आल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खानला पकडले. खान याच्याकडील पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत चरस सापडले.

हेही वाचा- महाविद्यालयात झालेल्या भांडणातून युवकावर हल्ला; युवक गंभीर जखमी

खान याच्याकडून चरस जप्त करण्यात आले. खान याच्या विरोधात अमली पदार्थ विक्रीचे आणखी काही गुन्हे आहेत का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, युवराज कांबळे आदींनी ही कारवाई केली.