डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या वीरेंद्र तावडे याने हिंदुत्त्वाचा प्रसार करण्यापूर्वी सहा वर्षे कोल्हापुरात काढली होती. त्यानंतर तो साताऱ्यामध्ये दोन वर्षे वास्तव्याला होता. कोल्हापूरमध्येच २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे यांचाही खून करण्यात आला होता. त्यामुळे पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येमागे समान धागा असू शकतो, असे दाभोलकरांचा मुलगा हामीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडे याला सीबीआय
नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्त्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला तावडे याने पहिल्यापासून विरोध केला होता, असे हामीद दाभोलकर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तावडे याने कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात दाभोलकरांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणही केले होते. सीबीआयने गेल्या शनिवारी न्यायालयामध्ये केलेल्या युक्तिवादातही त्याचा उल्लेख केला होता.
साताऱ्यामध्ये वास्तव्याला असताना तावडे सनातन संस्थेसाठी कार्यरत होता. २००६ ते २००८ या काळात तो साताऱ्यामध्ये वास्तव्याला होता. याकाळात तो वैद्यकीय व्यवसाय करत नसून, हिंदूत्त्त्वाच्या प्रचाराचे काम करीत होता, असे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितल्याचे हामिद दाभोलकर यांनी म्हटले आहे.
हिंदू सरकार सत्तेत येऊनही हिंदुंचा छळ थांबलेला नाही- अभय वर्तक
नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या कार्यक्रमाला वीरेंद्र तावडे यांनी त्यावेळी कडाडून विरोध केला. गणेशमूर्ती दान करण्याला त्याचा विरोध होता. गणेश विसर्जनावेळी घाटावर त्याने आपल्या वडिलांना हा उपक्रम धर्मविरोधी असल्याचे सांगितले होते, असेही हामीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा