पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो सेफ है’ आदी मुद्द्यांचा पुनरुच्चार करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यात मध्यमवर्गाचा ठळक उल्लेख करून, ‘मध्यमवर्गीयांची प्रगती होते, तेव्हा देशाचीही प्रगती होते,’ असे वक्तव्य केले.

पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील १० अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची सभा झाली. ‘भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नेहमीच मध्यवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. मध्यमवर्ग हा देशाचा कणा आहे. हाच वर्ग संपत्ती निर्माण करतो. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाण्यात मध्यमवर्गाचा मोठा वाटा आहे,’ असे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले.

What Parambir Sing Said?
Parambir Singh : “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?, अजित पवार म्हणाले, “आमचं नातं..”
Devendra Fadnavis : “काही नेत्यांना तमाशा…”; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ Video दाखवत भाजपाचा ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अमोल मिटकरींनी मागितली माफी
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

हेही वाचा >>>पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील अन्य पक्ष वा नेत्यांवर थेट टीका करण्याचे टाळून पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मध्यमवर्गासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचून एक प्रकारे भाजपच्या शहरी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. ‘मध्यमवर्गाच्या अपेक्षा आणि आकांक्षांची आम्हाला पूर्ण जाणीव असून, त्या पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहील,’ असे आश्वासन देतानाच, ‘राज्यातील संस्कृतीचे संरक्षण आणि प्रसारासाठी महायुतीने पावले उचलली असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मराठीजनांची अनेक दशकांची मागणीही पूर्ण केली आहे,’ असेही मोदी यांनी सांगितले.

‘भाजप सरकारचे नेहमीच मध्यमवर्गीयांना प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे मध्यवर्गाच्या हिताचे निर्णय घेऊन धोरणे आखली जात आहेत. प्राप्तिकर सवलत, मूल्यवर्धित करातील (व्हॅट) कपातीचा फायदा नागरिकांना मिळाला आहे. उपचारांच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी मध्यवर्गीयांना दिलेल्या सवलीतमुळे ३० हजार कोटींची बचत झाली आहे. हृदयविकाराच्या उपचारांसाठी वापरले जाणारे ‘हार्ट स्टेन्ट’ स्वस्त झाल्यामुळे मध्यमवर्गाला फायदा झाला आहे,’ असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आयुष्मान योजनेमुळे ७० वर्षांवरील ज्येष्ठांना दिलासा, गरिबांना पक्की घरे, मध्यमवर्गीयांच्या घरांना अनुदान, विद्यालक्ष्मी योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंतचे स्वस्त कर्ज, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गेल्या दहा वर्षांत एक लाख नव्या जागांची निर्मिती, स्पेस स्टार्टअपसाठी एक हजार कोटींच्या विशेष निधीची तरतूद, नोकऱ्यांसाठी विशेष पॅकेज, मोठ्या कंपन्यांत इंटर्नशिप आदी योजनांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

हेही वाचा >>>पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान

पंतप्रधान म्हणाले, ‘राज्याचा वारसा सुरक्षित करण्यासाठी स्मारकांची कामे पूर्ण झाली आहेत. विदेशी मानसिकतेच्या भूमिकेतून काँग्रेसने केवळ द्वेषापायी त्याकडे दुर्लक्ष केले होते. महाविकास आघाडीचे हे कारस्थान राज्यातील जनता यशस्वी होऊ देणार नाही. विकास आणि लोकांच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देणाऱ्या महायुतीला पुन्हा संधी देण्यासाठी आणि राज्याच्या, देशाच्या प्रगतीचा आधार होण्यासाठी एक व्हावे लागेल. एकत्र आलो तरच सुरक्षित राहू.’

पुण्याचा विशेष उल्लेख

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी, ‘पुणेकरांना तर हे नक्कीच आवडले असेल,’ असे म्हटले. मध्यमवर्गीयांसाठी काय केले, याची जंत्री मांडताना, पुणे हे नवोद्योगांचे केंद्र (स्टार्ट अप हब) असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. पुण्यातील वर्तुळाकार मार्ग, पालखी मार्ग, मेट्रो मार्गिकांचा विस्तार, मिसिंग लिंक यासाठी दिलेल्या निधीची माहितीही त्यांनी दिली.

शरद पवार, उद्धव यांचा उल्लेख नाही

लोकसभेच्या प्रचारासाठी पुण्यातील रेसकोर्सवर झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. त्याचा भाजपला लोकसभेत फटका बसल्याचे मानले जाते. मंगळवारी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावरही टीका करण्याचे टाळले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका टाळली.

मोदी उवाच…

– जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा काँग्रेसचा डाव- योजनांना स्थगिती देण्याची महाविकास आघाडीची कार्यपद्धती

– कर्नाटकमधील लुटीच्या पैशांचा काँग्रेसकडून राज्यातील निवडणुकीत वापर

– सत्तेसाठी काँग्रेसकडून तुष्टीकरणाचा खेळ

– जातींमध्ये संघर्ष निर्माण करून त्यांना कमकुवत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

– विविध जातींचे आरक्षण काढून घेण्याचे काँग्रेसचे कारस्थान

– काँग्रेसकडून दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन

– स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची राहुल गांधी यांनी स्तुती करून दाखवावी.