पुणे : प्रवासी असल्याची बतावणी करुन मोटारचालकाचा खून करणाऱ्या नाशिकमधील चोरट्यांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली, स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाल आनंदा चव्हाण (वय २२), मयूर विजय सोळसे (वय २३), ऋतुराज विजय सोनवणे (वय २१, तिघे रा. गंगापूर रस्ता, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली मोटारचालक राजेश बाबूराव गायकवाड (वय ५८) यांचा मृतदेह संतवाडी परिसरात २८ जानेवारी रोजी आढळून आला होता. त्यांचे हातपाय बांधलेले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा मोटारचालक राजेश हे माळशेज घाट रस्त्याने निघाल्याचे चित्रीकरणात आढळून आले होते. मोटार चाळकवाडी टोलनाक्यावरुन नाशिककडे निघाली होती. तेव्हा मोटारीत आणखी दोघे जण असल्याचे चित्रीकरणात आढळून आले होते. मोटार कसारा घाटात सापडली होती.

आरोपी नाशिकमधील असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर पोलिसांनी नाशिक भागातील सराइतांची चौकशी सुरू केली. आरोपी चव्हाण, साेळसे, सोनवणे यांनी लूटमारीच्या उद्देशातून मोटारचालक गायकवाड यांचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली. चौकशीत आरोपी प्रवासी म्हणून मोटारीत बसले होते. मोटारचालक गायकवाड यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह संतवाडी परिसरात टाकून दिला. मोटार चोरी करुन आरोपी पसार झाले. आरोपी विशाल चव्हाण आणि मयुर सोळसे यांच्याविरूद्ध गंगापूर (नाशिक) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक निरीक्षकअमोल पन्हाळकर,उपनिरीक्षक अमित सिदपाटील उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल यांनी ही कामगिरी केली.