राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीला उच्च पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य होईल. हे धोरण बहुशाखांच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास आणि संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याचे साधन ठरेल, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी मांडले.एमआयटी विश्वशांती चौथ्या दीक्षांत समारंभात डॉ. सिंग बोलत होते. इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आदी या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या चार हजार ५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बीटेकमधील केवल पद्मवारला संस्थापक अघ्यक्ष पदक, बॅचलर ऑफ एज्युकेशनची मिनू कलिता यांना कार्याध्यक्ष पदकाने गौरवण्यात आले.

हेही वाचा >>> राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य

ज्ञान निर्मिती आणि संशोधनाच्या वातावरण निर्मितीसाठी शिक्षण धोरण महत्त्वाचे ठरेल. तसेच डिजिटल युगात हे शिक्षण धोरण डिजिटल शिक्षणाचे वातावरण तयार करेल, असे डॉ. सिंग म्हणाले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नव्या धोरणात भर आहे. भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील काही वर्षांत भारत अवकाशात जाऊ शकतो. हे केवळ भारतीय युवकांमुळे घडू शकते. भारतामध्य़े मोठ्या प्रमाणात संधी वाट पाहत असल्याचे डॉ. कस्तुरीरंगन यांनी नमूद केले.

Story img Loader