पुणे : येरवड्यातील एका बहुराष्ट्रीय ‘बीपीओ’च्या आवारात युवतीवर सहकारी तरुणाने तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनडब्ल्यूसी) सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल समितीकडून दहा दिवसांत सादर केला जाणार आहे.

हेही वाचा >>> Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

येरवड्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या आवारात युवतीवर सहकाऱ्याने तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. कंपनीच्या वाहनतळात ही घटना घडली होती. याप्रकरणी कंपनीतील तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) याला अटक करण्यात आली. आर्थिक व्यवहारातून तरुणीचा खून झाल्याची माहिती तपासात मिळाली. कनोजा याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या घटनेची गंभीर दखल दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाचे माध्यम सल्लागार शिवम गर्ग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे. या समितीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य, सचिव मीनाक्षी नेगी, हरियाणाचे निवृत्त पोलीस महासंचालक बी. के. सिन्हा, केरळातील निवृत्त पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा यांचा समावेश आहे. त्यांना विधी सल्लागार मनमोहन वर्मा साह्य करणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान कंपनी, बीपीओ, तसेच खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबतची चौकशी राष्ट्रीय महिला आयोगाकडून केली जाणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, हडपसर भागातील घटना

कंपनीच्या आवारात युवतीवर हल्ला झाला. त्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर युवकाला का रोखले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका का घेतली, तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कंपनीच्या स्तरावर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची चौकशी सत्यशोधन समितीकडून करण्यात येणार आहे. कामाच्या ठिकाणची सुरक्षा, खासगी कंपनीचा पोलीस यंत्रणेशी असलेला समन्वय याबाबतची चौकशी केली जाणार आहे, तसेच खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेविषयी करण्यात आलेल्या उपाययोजना, नियमावली याबाबत उपाययोजना करण्यात येेणार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader