पुणे : केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे २७वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. युवकांचा सर्वांगिण विकास, संस्कृती आणि परंपरांचे जतन, युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण आठ हजार जण महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – हिंजवडीत कंपनीतील गॅसभट्टीच्या स्फोटात २० कामगार जखमी; चार कामगारांची प्रकृती गंभीर

हेही वाचा – पिंपरी : अजितदादांच्या कट्टर समर्थकाचे ठरले, संजोग वाघेरे शनिवारी शिवबंधन बांधणार; राष्ट्रवादीत कोणावर नाराजी नाही, पण…

महोत्सवाच्या आयोजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर समिती, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर कार्यकारी समिती, नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती, तर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National youth festival in january in nashik inauguraion by pm narendra modi pune print news ccp 14 ssb