पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घडय़ाळ या चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही. आमचे म्हणणे ऐकून न घेताच आयोगाने घडय़ाळ या चिन्हाबाबत वाद असल्याचे जाहीर करून टाकले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या त्रमासिक बैठकीनंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घडय़ाळ या निवडणूक चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नव्हता. आमचे म्हणणे ऐकून न घेताच निवडणूक आयोगाने घडय़ाळ या चिन्हाबाबत वाद असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करणार आहोत.

शरद पवारांचे स्वागत करेन – वळसे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये किंवा माझ्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली, तर मी पवार यांचे स्वागत करीन. माझे कार्यकर्ते शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहतील, असे वक्तव्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. त्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.