नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर गुरुवारी आणखी एका निवडणुकीचे निकाल समोर आले. ही कुठली निवडणूक असे म्हणून चकित झालात? ही निवडणूक होती ‘पुण्याचे निसर्ग मानचिन्ह’ म्हणून ओळख मिळवण्यासाठीची आणि उमेदवार होते चक्क प्राणी, पक्षी, झाडे-झुडपे आणि अगदी जीवाणू-विषाणूसुद्घा!
बायोस्फीअर्स संस्था, पुणे फॉरेस्ट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डिव्हिजन आणि पालिकेचे इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र यांच्यातर्फे पुण्याची निसर्ग मानचिन्हे निवडण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. यात निसर्गातील २० प्रकारांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार निश्चित करण्यात आले होते. उमेदवार निश्चितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि पर्यावरणप्रेमींनी आपली मते नोंदवून प्रत्येकी दोन उमेदवार निवडले होते. त्यानंतर प्रत्यक्ष निसर्ग मानचिन्हे निवडण्यासाठी मात्र पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी मतदान केले. या निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. बायोस्फीअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी विजयी उमेदवारांविषयी माहिती दिली.
पुण्याचा प्राणी आणि पुण्याचा पक्षी कोण असणार याविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर उद मांजराचा
पराभव करून लांडग्याने पुण्याचा प्राणी म्हणून मानचिन्ह पटकावले. तर चित्रबलाकावर भरघोस मतांनी मात करून शृंगी घुबडाला पुण्याचा पक्षी म्हणून ओळख मिळाली. सरगोटा, वाघ्या बेडूक, पत्थर चाटू मासा, आग्या मधमाशी, सिंहगड विंचू यांनीही मतांमध्ये आघाडी घेत विजय मिळवला. पुण्याचे खनिज म्हणून बहुसंख्य पर्यावरणप्रेमींचा ‘कॅव्हेंझाइट’ खडकाकडे ओढा होता. तो मतांमधूनही दिसून आला आणि ‘ग्रीन अॅपॉफिलाइट’चा पराभव होऊन कॅव्हेंझाइटला पुण्याचे खनिज म्हणून मान्यता मिळाली. सगळ्यात लक्षवेधी चढाओढ होती पुण्याचा विषाणू कोण होणार याची! स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरणारा एच १ एन १ आणि पपया रिंगस्पॉट व्हायरस असे दोन उमेदवार या किताबासाठी रिंगणात होते. अखेर एच १ एन १ हाच पुण्याचा विषाणू ठरला.
मानचिन्हाच्या किताबासाठी अशी झाली चढाओढ –
प्रकार उमेदवार मिळालेली मते (%) विजयी उमेदवार
सस्तन प्राणी लांडगा ५९ लांडगा
उद मांजर ४१
पक्षी चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) २३ शृंगी घुबड
शृंगी घुबड ७७
सरिसृप डेक्कन सॉफ्ट शेल टर्टल (मयूर कासव) ४२ सरगोटा
फॅन थ्रोटेड लिझार्ड (सरगोटा) ५८
उभयचर प्राणी वाघ्या बेडूक ५१ वाघ्या बेडूक
पर्वती बेडूक ४९
मासा पुणे कॅटफिश (पत्थर चाटू) ६४ पत्थर चाटू
चिकली ३६
कीटक आग्या मधमाशी ५६ आग्या मधमाशी
अॅटलास पतंग ४४
अष्टपाद प्राणी सिग्नेचर स्पायडर ४० सिंहगड विंचू
सिंहगड विंचू ६०
वृक्ष इंडियन टॉर्च ट्री (गणेर) ६७ गणेर
चेर/ चावरा ३३
फूल शिंदळ माकोडी ६१ शिंदळ माकोडी
घंटी मुद्रा ३९
पीक अंजिराचे स्थानिक वाण ६६ अंजिराचे स्थानिक वाण
मालदांडी ज्वारी ३४
पिकाचा रानटी भाऊबंद रान हळद ८० रान हळद
रान मूग २०
विषाणू एच १ एन १ ५९ एच १ एन १
पपया रिंगस्पॉट व्हायरस ४१
खनिज कॅव्हेंझाइट ६० कॅव्हेंझाइट
ग्रीन अपॉफिलाइट ४०
उर्वरित निसर्ग मानचिन्हे खालीलप्रमाणे –
प्रकार विजयी उमेदवार
नेचे अॅन्युअल फर्न
शैवाल (ब्रायोफाइट) इंडियन पेटलवोर्ट
शेवाळ (अल्गी) पाषाण स्टोनवोर्ट
कवक/ बुरशी (फंजाय) स्टिंगहॉर्न फंजाय
दगडफूल (लायकेन) पार्मोट्रोमा टिंकटोरम
जीवाणू ह्य़ूमन गट मायक्रोब
जीवाष्म (फॉसिल) शहामृगाच्या अंडय़ाची जीवाष्मे (एक्स्टिंक्ट ऑस्ट्रिच)