अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे २० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २१ व २२ मे रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक राजन खान व स्वागताध्यक्षपदी राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर संमेलनामध्ये वृक्षारोपण, पाणी आडवा, पाणी जिरवा, जल व्यवस्थापन या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक राजकुमार काळभोर आणि साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी दिली. संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९५११११८८९९, ९९२२९८६३८६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.