चमेली ८०० ते ११०० रुपये, कागडा ४०० ते ५०० रुपये किलो

नवरात्रोत्सवात महिलांकडून जुई, चमेली, कागडा या फुलांपासून तयार करण्यात आलेले गजरे आणि वेण्यांना मोठी मागणी असते. या फुलांपासून तयार करण्यात आलेली वेणी देवीला अर्पण करतात. शहरातील फूल विक्रेते तसेच हार विक्रेत्यांकडूनही जुई, कागडा, चमेली या फुलांना मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने जुईला विक्रमी भाव मिळाला असून, प्रतिकिलो ११०० ते १२०० रुपये या दराने जुईची विक्री केली जात आहे.

The price in the gold market in Delhi is Rs 77 thousand 850 print eco news
सोन्याला सार्वकालिक उच्चांकी झळाळी; दिल्लीतील सराफा बाजारपेठेत भाव ७७ हजार ८५० रुपयांवर
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
special vehicle number vasai marathi news,
वसई: विशेष वाहन क्रमांक घेण्याकडे कल वाढला, पावणे दोन वर्षांत ११ हजार वाहनांची आकर्षक क्रमांकासाठी नोंदणी, ९ कोटींचा महसूल
Lalbaugcha Raja Donation News
Lalbaugcha Raja : साडेतीन किलो सोनं, ६४ किलो चांदी आणि ‘इतके’ कोटी; राजाच्या चरणी भाविकांचं भरभरुन दान
Onion price increased by Rs 400 quintal rate to Rs 4600
कांदा दरात ४०० रुपयांनी वाढ, क्विंटलचे दर ४६०० रुपयांवर
pune city have no toilets anywhere for people during ganpati visarjan
उरूळी देवाची, फुरसुंगी गावांवर पुणेकरांचे ५०० कोटी खर्च
electric mobility promotion scheme 2024 to be extended says hd kumaraswamy
अवजड उद्योगमंत्र्यांचा मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन कायम राहण्याचा दावा
ganeshotsav latest news in marathi
ठाणे: गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना निर्बंध

जुई, चमेली, शेवंती या फुलांचा वापर करून गजरे तसेच शेवंतीपासून वेण्या तयार केल्या जातात. मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलो जुईला एक हजार ते बाराशे रुपये किलो असे दर मिळत आहेत. चमेलीला आठशे ते अकराशे आणि कागडय़ाला चारशे ते पाचशे रुपये किलो असे दर मिळाल्याचे फूल बाजार आडते संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी सांगितले. कागडय़ाच्या फुलांपासून गजरे तयार करण्यात येतात. जुई, चमेलीची फुले सुवासिक असतात. कागडा सुवासिक नसतो. जुईची फुले दोन दिवस टिकतात तर चमेली अवघी एक दिवस टिकते. जुईपेक्षा चमेली जास्त सुवासिक असते, असे गायकवाड यांनी नमूद केले.  सध्या घाऊक बाजारात दररोज चमेली ४० ते ५० किलो, जुई २० किलो अशी आवक होत आहे. कर्नाटकातील गदग येथून कागडय़ाची आवक होत आहे. तेथील शेतकरी दररोज एसटीमधून पुण्यातील फूल बाजारात कागडय़ाची फुले विक्रीसाठी पाठवतात. सिंहगड रस्त्यावरील नांदेड, शिवणे भागातून फुलांची आवक होत आहे. यवत, माळशिरस, सुपे, पारनेर भागातून शेवंतीची आवक होत आहे. प्रतिकिलो शेवंतीला ४० ते १०० रुपये असा दर मिळत आहे.

फुलांची तोडणी जिकिरीची

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत चमेलीला मोठी मागणी असते. चमेलीच्या फुलांची तोडणी करणे जिकिरीचे काम असते. यंदा सात ते आठ गुंठय़ांमध्ये चमेलीची लागवड केली आहे. दररोज आठ ते दहा किलो चमेली बाजारात विक्रीसाठी पाठवत आहे. मागणी चांगली असल्याने चमेलीला दर चांगला मिळत आहे. चमेलीची लागवड फायदेशीर आहे, मात्र तोडणी काळजीपूर्वक करावी लागत असल्याचे शिरूर तालुक्यात असलेल्या कोंढापुरी गावातील फूल उत्पादक शेतकरी संतोष कुदळे यांनी सांगितले.