छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे.जगताप यांनी आंदोलन करू नये, आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जगताप जबाबदार राहतील,असे पोलिसांनी नोटिशीमध्ये पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>पुणे: दुचाकी टॅक्सी, ‘आरटीओ’त न्यायालयीन वाद
गनिमी कावा करुन राजभवनावर पोहोचणार – जगताप
दरम्यान, नोटिशीची कुणकूण लागल्याने जगताप अज्ञानस्थळी रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जगताप यांनी समाज माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.गनिमी कावा करुन राजभवनावर पोहचणार आहोत. दिवसभरात राज्यपालांना ‘गो बॅक’च्या घोषणा ऐकाव्या लागतील, त्यांना निषेधाचे झेंडे पाहावे लागतील तसेच ‘राज्यपाल मुर्दाबाद’च्या घोषणाही त्यांना ऐकाव्या लागतील, असा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.