पिंपरी : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात चूल मांडून आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षां जगताप यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून इंधन दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध केला.

या वेळी वाघेरे म्हणाले की, इंधन दरवाढ आणि महागाईवरून सामान्य जनतेच्या मनात चीड आणि आक्रोश आहे. महिलांचे घरातील अंदाजपत्रक कोलमडून पडले आहे. केंद्रातील सरकार भांडवलदार आणि धनदांडगे यांच्याच हितासाठी काम करत असून गोरगरिबांवर अन्याय करत आहे. ही जुलमी राजवट आणि सामान्यांना संकटाच्या खाईत लोटणारे मोदी सरकार जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp agitation pimpri protest against fuel price hike ssh