पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची पहिली यादी जाहीर करताना, पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा असलेल्या, तसेच पक्षांतर्गत आणि भाजपचा विरोध असलेल्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन वेगळी खेळी केली आहे. त्याचबरोबर, महायुतीमध्ये वादाच्या ठरलेल्या जागांवरील उमेदवारांची घोषणा न करता त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. विद्यमानांना नाराज न करणे आणि त्यांना विरोध असलेल्यांची नंतर समजूत घालणे, अशी रणनीती यात दिसत असून, त्या योगे राष्ट्रवादीचे (अजित पवार) पुणे जिल्ह्यावरील वर्चस्व न गमावण्याचा हेतू असल्याचे म्हटले जाते.

अजित पवार स्वत: बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असून, आंबेगाव येथून दिलीप वळसे-पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनील शेळके, जुन्नरमधून अतुल बेनके आणि हडपसरमधून चेतन तुपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

हेही वाचा >>>पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही

यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. बेनके यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोध आहे. त्यातच भाजपनेही पवार यांच्यावर दबाव टाकला होता, तर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याबाबतही कार्यकर्त्यांची नाराजी होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हडपसर मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांनी प्रारंभी ‘तटस्थ’ भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, तुपे यांची भूमिका कायमच संदिग्ध राहिली होती. ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चाही सातत्याने होत होती. असे असूनही या चारही विद्यमानांना पुन्हा संधी मिळाली आहे.

अजित पवार यांचे सहकारी, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या ॲड. पूर्वा यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण, वळसे पाटील यांनाच पुन्हा संधी मिळाल्याने या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून, त्यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी

शिवसेना (शिंदे) पक्ष नाराज

महायुतीच्या जागावाटपात हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे) द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते मेळावा घेऊन पुढील दिशा निश्चित करणार आहेत.

वडगावशेरी, खडकवासल्याबाबत सावध भूमिका

वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये एकमत झालेले नाही. वडगावशेरी मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्या बदल्यात खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला देण्याची भाजपची तयारी आहे, असे समजते. पण, हा प्रस्ताव अजित पवार यांना अमान्य आहे. शहरातील तीन मतदारसंघांसाठी अजित पवार आग्रही असून, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघांसाठी त्यांनी जोर लावला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांबाबत पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader