पिंपरी : राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही शहरातील पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. पक्षाच्या रविवारी (२२ सप्टेंबर) झालेल्या मासिक बैठकीमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले. या ठरावामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत कलगीतुरा रंगला आहे.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की

हेही वाचा – ‘सीटीईटी’ लांबणीवर.. आता कधी होणार परीक्षा?

हेही वाचा – मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. तर, भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी चिंचवडे या आमदार आहेत. महायुतीत ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडे मतदारसंघ कायम राहतील असे मानले जात होते. मात्र, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीवर दावा सांगितल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला. भाजपनेही पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला. शिवसेना आणि भाजपने पिंपरी मतदारसंघावर दावा केल्याने आमदार बनसोडे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते. त्यामुळेच आता राष्ट्रवादीनेही पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तीनही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.