मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत घडला आहे. मुख्याधिकारी यांच्यासमोरच घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी बापू भेगडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बापू भेगडे हे नगर परिषदेत त्यांच्या शिष्टमंडळासह गेले होते. नगर परिषदेने मिळकत करवाढ केल्याने यावर त्यांनी जाब विचारला. करवाढ कशी लागू असेल असा प्रश्न उपस्थितांनी केला. मात्र, महिला अधिकारी यांनी दिलेलं उत्तर उपस्थितांना अवास्तव वाटलं. त्यामुळं बापू भेगडे हे संतापले आणि त्यांनी महिला अधिकारी यांना उद्देशून अर्वाच्च भाषा वापरली. महिला अधिकारी यांनी त्यांना प्रतिउत्तर देत पलटवार केला. तेव्हा, बापू भेगडे अधिकच संतापले आणि त्यांनी खुर्चीवरून उभे राहात महिलेला चांगलंच सुनावले. एकेरी भाषा वापरत शिवीगाळ केली. असे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत घडला आहे. मुख्याधिकारी यांच्यासमोरच घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. pic.twitter.com/zhrmxCCyOG
— LoksattaLive (@LoksattaLive) June 14, 2024
हेही वाचा – पिंपरी : समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठा विस्कळीत; काय आहे कारण?
महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी असून राज्यात त्यांची सत्ता आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांनी अशी भाषा वापरणे अशोभनीय असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणी बापू भेगडेंच्या प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.