पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (२६ मार्च) पुण्यात होणार आहे. निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप अद्यापही झालेले नसतानाही ही बैठक बोलाविण्यात आली असून काही जागांवरील उमेदवारांची नावे या बैठकीत निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, संगमवाडी येथील बोट क्लब येथे दुपारी बारा वाजता बैठक होणार असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र बैठकीचा तपशील अद्यापही जाहीर झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा…पाणी चोरी, प्रदूषण… ‘जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस का बजावली?

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप अद्यापही झालेले नाही. जागा वाटपासंदर्भात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसात जागा वाटप होईल, असे महायुतीकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. जागा वाटप लांबणीवर पडले असतानाच ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

हेही वाचा…पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

बोट क्लब येथे ही बैठक आयोजित केल्याचे पुढे येत असून त्यासाठी पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत लोकसभेच्या काही जागांवरील उमेदवारांची निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बैठक होणार आहे. मात्र त्याचा तपशील अद्यापही मिळालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group to hold key meeting in pune likely to finalize lok sabha candidates pune print news apk 13 psg