राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवरुन सध्या वाद पेटला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं असता वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

मिटकरींच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद?

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहित. आचमन करा…”, असं म्हणत मिटकरींनी मंचावर बसलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत पुढे बोलणं सुरु ठेवलं. “मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी मुलीचा बाप म्हणाला बसा साहेब कन्यादान आहे. म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना… आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हणाले मी बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली,” असं मिटकरी यांनी सांगितलं.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

NCP कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघाला रुपाली ठोंबरेंनी पळवून लावलं; केळी घेऊन पोहोचल्या; म्हणाल्या “मी तर त्यांना…”

यानंतर मिटकरी काही मंत्र म्हणाले. नंतर त्यांनी लग्न लावणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे डोळ्याला पाणी लावा असं सांगितलं. नंतर ते गुरुजींच्या शैलीमध्येच, “तुमचा हात माझ्या हातात द्या,” असं म्हणाले. हे ऐकून मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसू लागले. पुढे बोलताना मिटकरींनी, “आचमन करा, धुपम्, दिपम् नमस्कारम्…” असं म्हणत पुन्हा मंत्र म्हटले. मंत्र म्हणताना त्यांनी, “मम भार्या समर्पयामि” असं वाक्य म्हटलं. मिटकरींनी पुढे बोलताना, “मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. म्हटलं अरे येड्या ते महाराज असं म्हणतायत.. मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा.” यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. “आरारा… कधी सुधरणार आपण. ही लोक आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली,” असंही मिटकरी म्हणाले.

महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना अमोल मिटकरी यांचं तीन शब्दांचं ट्वीट; म्हणाले…

दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांनी मात्र माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार संतापले

पुण्यात प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर विचारलं असता ते संतापले आणि म्हणाले की, “माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत”.

“महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधे कोळशाची खाण विकत घेणार”

अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसह नितीन राऊत यांनी लोडशेडिंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती दिली. “सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधे कोळशाची खाण विकत घेण्याचा विचार करत आहे. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील सरकार काँग्रेसच्या विचारांचं असून सोनिया गांधींनी त्यासंबंधी सरकारला सांगितलं आहे. त्याचबरोबर परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार आहे. त्यासंबंधी निर्णय घेतला आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. फक्त महाराष्ट्र नाही देशातील अनेक राज्यांना केंद्र सरकार पुरवठा करु शकत नाही असं सांगत त्यांनी सूडाचं राजकारण होत असल्याचा दावा फेटाळला.

“पोलीस अधिकाऱ्यांच्या स्थगितीबद्दल माहिती नाही”

“मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यासंबंधी निर्णय घेतला होता. तो त्यांचा अधिकार आहे. कमिटी शिफारस करते त्यानुसार निर्णय होतो. काहींना स्थगिती दिली असं आज मी वाचलं आहे. मुंबईत जाऊन जोपर्यंत मी याबद्दल माहिती घेत नाही तोवर काही सांगू शकत नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.

मिटकरी यांनी ‘ते’ वक्तव्य केलं तेव्हा स्टेजवर हसणारे मुंडे वादावर म्हणाले; “जात-पात, धर्म आमच्या अंगाला….”

“२२१ कोटींचा नागरी सहकारी बँकांचा घोटाळा समोर आणण्याचे काम मीडियाने केले. पण साडे तीन हजारापेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांचा ६७ हजार कोटींचा घोटाळा याच काळात झाला. ते प्रमाण एकूण घोटाळ्याच्या ९० टक्के आहे आणि नागरी सहकारी बँकांचं प्रणाम पाव टक्का आहे. पण मी कुणाचं समर्थन करत नाही. कोणत्याही प्रकारच्या बँका असल्या तरी त्यांनी जनतेचा पैसा सुरक्षितच ठेवला पाहिजे. कर्ज बुडवणार नाही अशा नेत्यांनाच ते दिलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

“मी खासगी रुग्णालयात गेलो तेव्हा मीच बिल भरलं होतं. ज्या मंत्र्याने घेतलं त्याला विचार बाळा. तू का असं केलं. मंत्री असताना सरकारचा पैसा खर्च करण्याऐवजी स्वत:चा पैसा खर्च करायला हवा होता,” असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं.

Story img Loader