पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगरमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता टेकवडे यांचा ६३१ मतांनी विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विजयकुमार गुप्ता यांचा पराभव केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप-शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. त्यामध्ये ४६.९ टक्के इतके मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सुजाता टेकवडे यांना ३४८६ मते पडली, तर शिवसेनेच्या विजयकुमार गुप्ता यांना २८५५ मते पडली. भाजपच्या गणेश लंगोटे यांना २००२ मते मिळाली. ६३१ मतांनी टेकवडे यांनी गुप्ता यांच्यावर विजय मिळवला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी झाडाझडती घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व नेते व नगरसेवक झाडून कामाला लागले होते. भाजप शिवसेनेचे नेतेही मतदारसंघामध्ये ठाण मांडून होते.
चिंचवडमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुजाता टेकवडे विजयी
सुजाता टेकवडे यांना ३४८६ मते पडली
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-01-2016 at 12:16 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp candidate sujata tekawade wins byelection in chinchwad