पुणे : महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांवर भाष्य केले.
हेही वाचा – तुमची नाकाला जीभ लागते का? पुण्यातील ज्येष्ठ व्यक्तीने केली कमाल, पाहा व्हिडिओ..
हेही वाचा – पुणे : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार युवतीचा मृत्यू, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात
पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. त्यांचे एक घर कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर सोडून कोथरूड येथे त्यांना यावे लागले. कोथरूडमध्ये त्यांचे काय योगदान होते त्याबद्दल कोथरूडकरांनाच विचारलेले बरे राहील. तसेच, ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही. त्यांच्यावर काय भाष्य करावे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.