राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर आज (२८ डिसेंबर) अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.

अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेचा दुरुपयोग कशा प्रकारे केला जातो, याचं उत्तम उदाहरण अनिल देशमुख यांच्यासोबत घडलं आहे. एका सुसंस्कृत आणि कर्तुत्ववान नेत्याला १३ महिने चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवलं, असं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे,” अशी माहिती शरद पवारांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Selected reactions to the article pracharak sanghacha kana
पडसाद : हे कौतुक फार दिवस पुरणार नाही…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
Anil Deshmukh, Anil Deshmukh news, Anil Deshmukh latest news,
देशमुखांची बदलेली भूमिका गृहकलह की राजकीय खेळी ?
NCP announced candidate from Sharad Pawar group in Murtijapur constituency there is split in party
राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”

हेही वाचा- अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता…”

अनिल देशमुख यांच्या अटक प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा आहे. अनिल देशमुखांविरुद्ध कोणताही पुरावा नाही, असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे. सर्वात आधी अनिल देशमुखांवर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. आरोपपत्रात ही रक्कम अवघी साडेचार कोटी दाखवण्यात आली. त्यानंतर अंतिम आरोपपत्रात ही रक्कम एक कोटी दाखवण्यात आली,” असा दावा पवारांनी केला.

हेही वाचा- “आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत…”, पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान!

भाजपाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख करत शरद पवार पुढे म्हणाले, “न्यायपालिकेने न्याय दिला याचं समाधान आहे. पण तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करुन मी आणि संसदेतील काही ज्येष्ठ सहकारी देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकार्यावर जी वेळ आली, ती वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी आपण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना भेटणार आहोत. आर्थिक गैरव्यवहारसंबंधी कायद्यात बदल करा, अशी आम्ही मागणी करत नाहीत. पण त्याबद्दल आम्ही संसदेत चर्चा करणार आहोत,” असं शरद पवार म्हणाले.