पुणे : सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे संकट उभे राहिले आहे. बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाही. या परिस्थितीत महापुरुषांनी भीक मागितली, असे विधान राज्यातील नेते करत आहेत. मात्र सामान्य माणूस माणूस मोठ्या हिंमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी जोडले हात

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, ॲड. वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. यानिमित्ताने बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात जागर केला जाईल.  कृषी खात्याचा मंत्री झाल्यावर या क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम कोणी केले, याची माहिती घेत असातना महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कृषी क्षेत्रात चांगले काम असल्याचे दिसून आले. फुले यांनी आधुनिक विचाराची कास धरली. त्याकाळी नवा विचार हाती घेतला, असे पवार यांनी सांगताना सरकारच्या धोरणावर टीका केली.