आळंदी: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच दर्शन घेतलं. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर हे उपस्थित होते. शरद पवार यांनी या अगोदर २०१९ ला माऊलींच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं होतं. अशी माहिती विश्वस्त ढगे यांनी दिली आहे. देवस्थानकडून तुळशीहार आणि माऊलींची मूर्ती देऊन शरद पवार यांचा सत्कार केला.
आणखी वाचा-Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज विविध कार्यक्रमानिमित्त आळंदी तसेच जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन केली आहे. शरद पवार हे यानंतर चऱ्होली येथे भागवत वारकरी संमेलनाच त्यांचं हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रमानंतर ते जुन्नरला रवाना होतील. तिथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. मग, दुपारी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेतून ते कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आळंदी मध्ये शरद पवार हे २०१९ मध्ये आले होते. त्यांनी त्यावेळी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतलं होतं.