लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि चार कार्याध्यक्ष यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शरद पवार गटाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिला आहे.

Ajit pawar on Assembly Election 2024
Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती
Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला
Sharad Pawar, Sharad Pawar on Chief Minister
Sharad Pawar : “मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, परिवर्तनासाठी सत्ता हवी”, शरद पवार यांचे स्पष्टीकरण
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
Mumbai mallikarjun kharge marathi news
“मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारिणीने अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाने नऊ जणांची कार्यकारी समिती नेमली. आता अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या पदाधिका-यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.

हेही वाचा… प्रवाशांसाठी खूषखबर! क्यूआर कोड स्कॅन करा, एसटीची माहिती मिळवा

महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये पक्षातील काही आमदारांनी सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. त्याला पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. ही कृती पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी आहे. त्यामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी आणि फजल शेख यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून, पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे.