पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, क्रीडा व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चारही विषय समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व दिसून आले.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पक्षीय संख्याबळानुसार समित्यांमध्ये निवड करण्यात आली. विधी समितीत भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, किरण मोटे, वैशाली काळभोर, साधना जाधव, शैलजा शितोळे, नितीन काळजे, वैशाली जवळकर, नीलेश बारणे यांची निवड झाली. शहर सुधारणा समितीसाठी आशा सुपे, आशा सूर्यवंशी, सविता साळुंके, शांताराम भालेकर, जितेंद्र ननावरे, उषा वाघेरे. जयश्री गावडे, चारूशीला कुटे, तानाजी खाडे यांची निवड झाली. क्रीडा समितीत वसंत लोंढे, मंदाकिनी ठाकरे, रामदास बोकड, प्रभाकर वाघेरे, भारती फरांदे. उल्हास शेट्टी, विमल काळे, धनंजय आल्हाट यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण समितीत शुभांगी लोंढे, सुजाता पालांडे, सुमन नेटके, वनिता थोरात, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, अनिता तापकीर, शकुंतला बनसोडे, प्रतिभा भालेराव, विमल जगताप यांचा समावेश झाला आहे. महापौर तसेच आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.