एकनाथ खडसे यांच्या जागेचा अभ्यास करणार..

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंत्री सामंत म्हणाले, अजितदादांनी भाषण काय केले यापेक्षा आठ दिवसातील गमती-जमती सांगतो. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे. आणि अजितदादांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील या नेत्यांच्या विधानामुळे वज्रमूठ किती मजबुत आहे हे दिसते.

हेही वाचा >>>“विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा”,अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझ्या भावाच्या सर्व इच्छा…”,

मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते असे विचारले असता मंत्री सामंत म्हणाले, आमच्या पक्षाचे आमंत्रण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनावर आहे. कोणी पक्षात यायचे, कोणाला घ्यायचे हे ते ठरविणार आहेत, कारण ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत.एमआयडीसीत खडसे यांचा भूखंड कोणता हा मोठा फार आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याचा अभ्यास करतो आणि बोलतो, असेही ते म्हणाले.