बंडातात्या कराडकर यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राजकीय महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी वकिलामार्फत बंडातात्यांविरुद्ध पुणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांच्यावतीने अॅड विजयसिंह ठोंबरे, अॅड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे. अॅड विजयसिंह ठोंबरे म्हणाले, “आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सातारा येथील बंडुतात्या कराडकर यांनी राजकीय महिलांविषयी दिलेल्या वादग्रस्त आणि बदनामीकारक विधान केलं होतं. त्याविरोधात आज न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. माझ्या पक्षकार रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही मानहानी आणि बदनामीचा फौजदारी खटला दाखल केलाय.”

sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
Vanraj Andekar murder , Man supplied arms arrested,
पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणात शस्त्रे पुरविणारा सराइत गजाआड
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ

रुपाली पाटील ठोंबरे काय म्हणाल्या?

नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

वाइन विक्रीच्या निर्णयावरुन टीका

“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

PHOTOS : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्यांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

“उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंचा उल्लेख करत दारुसंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्यांचा माफीनामा; म्हणाले, “माझं चुकलं…”

“अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

बंडातात्यांचा माफीनामा

“ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असं बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसंच राज्यभरात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.