पुणे : ‘माझ्या सांगण्यावरुन सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते खरे. पण, त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले’ अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे या दोघांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. याची प्रचिती पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने आली. त्यावेळच्या सरकारमध्ये मी गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपली जी काही प्रकरणे असतील, तर त्या शिंदे यांना द्यायचे ठरवले. पुढे झालेल्या निवडणुकीत शिंदे यांना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.
पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे लोक ठराविकच असतात. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</p>