उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला असल्याचा दावा केला होता. फडणीसांच्या या दाव्यानंतर पहाटेच्या शपथविधीची पुन्हा एकदा नव्याने चर्चा होत आहे. यावरच आता शरद पवार यांनी आणखी एक विधान केले आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली, असे पवार म्हणाले आहेत. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना साथ दिली याचा आनंद असल्याची भावना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता हे काल शरद पवार यांनी सांगितल्यानंतर मी जे केले ते योग्य केले, असे ही बनसोडे म्हणाले आहेत.
हेही वाचा- मी मनसेतच! अजय शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सांगितले कारण, म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीबाबत चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निधनानंतर शरद पवार यांनी उत्तर देत राजकीय भूकंपच केला. दरम्यान, अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि पहाटे च्या शपथविधीचे साक्षीदार आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की,
शपथ विधीच्या अगोदर अजित पवार यांचा पहाटे फोन आला होता. तुम्ही आहे त्या परिस्थित मुंबईत या अस अजित दादांनी सांगितलं. साडेतीन तासात दादांच्या तिथं पोहचलो. माझ्या डोळ्याने पाहिलं की अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ विधी घेत होते. एवढी वर्ष झाले राष्ट्रवादी चे काम करत असल्याने तो माझ्यासाठी धक्का देणारी घटना होती.
हेही वाचा- ‘दगडूशेठ’च्या गोडसे परिवाराचा पाठिंबा असल्याचा महाविकास आघाडीचा दावा
पुढे ते म्हणाले की, मी अजित दादांचा कटर समर्थक आहे. दादा जसे म्हटले तस मी केलं. म्हणून मी त्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. दादा जे करतील योग्य करतील म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कोण आहे किंवा कोणासोबत शपथ घेत आहेत हे पाहिलं नाही. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेची शपथ होती असे जेव्हा काल पवार साहेबांनी सांगितलं. त्यामुळं मी अजित दादांसोबत राहिलो ते चांगलं झालं, याचे समाधान आहे. पहाटे ची शपथविधी झाला म्हणून च उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकले अस शरद पवारांनी काल सांगितले.