महाविकास आघाडीचे बंडखोर नेते, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडी विरुद्ध बंडखोर राहुल कलाटे असा सामना रंगताना दिसतो आहे. त्यांच्यात आरोप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

हेही वाचा- पुणे : शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडची माघार

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी थेट राहुल कलाटे यांना प्रश्न करत तुमचा अजेंडा काय आहे? तुम्ही बंडखोरी का? केली हे जनतेसमोर येऊन सांगावे असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच, नुरा कुस्ती पहायची असेल आणि कोण सुपारी बहाद्दर आहे हे बघायचे असल्यास तुम्ही समोर या त्याला उत्तर देण्याची आमच्यात ताकद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा- पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार

सुनील शेळके म्हणाले की, महाविकास आघाडीच्या हातात हात घालून काम करू या भावनेतून आम्ही राहुल कलाटे यांची मनधरणी करत होतो. मात्र त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट ताकदीने निवडणुकीत उतरून विजयी मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले की, कुस्ती कुठली आहे हे ऐकायचं असेल तर समोर या, नुरा कुस्ती की सुपारी बहाद्दर कोण कशा पद्धतीने आहे हे समोरासमोर येऊन उत्तर देण्याची आमच्यात ताकद आहे, आपण समोर यावे. असे शेळके म्हणाले, आपण टीका टिपण्णी करत असताना स्थानिक नेत्यांवर करावी, अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यावर केली तर मला तोंड उघडावे लागेल. आपण बंड खोरी का? केली आपला अजेंडा काय आहे हे जनतेला सांगावे असे त्यांनी म्हटले आहे. नाना काटे म्हणाले की, माझ्यासोबत महाविकास आघाडी आहे मी निवडणूक जिंकणारच. बंडखोरी झाली असली तरी शिवसेना माझ्यासोबत आहे. महाविकास विरुद्ध भाजपा अशी लढत होणार असे त्यांनी सांगितले.