विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कृत्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

आपल्या न्याय मागण्यांसाठी अत्यंत शांततेत मोर्चा काढणाऱ्या मूकबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच शांततेने मोर्चा काढणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असा सवाल करत गृहमंत्री म्हणून फडणवीस हे संपूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.