पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मतदार संघातील प्रश्ना बाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दसरा मेळाव्यावरून वाद सुरू झाला आहे या माध्यमांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, शरद पवार साहेब काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की,मुख्यमंत्री हे पद खूप मोठे असते. हे पद सर्वसमावेशक असले पाहिजे. तसेच आमच्या काळात देखील दसरा मेळावा होत होता. त्यावेळी आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरून दिलदारपणे भाषण होत असायची. आम्ही देखील भाषण उत्सुकतेने लाईव्ह पाहत असायचो की, आपल्या विरोधात काय बोलले आहेत. त्यामुळे मोठा नेता असतो ना तो नुसत्या पदाने मोठा होत नाही ,तो कर्तुत्ववाने मोठा होतो. राजा किंवा कुठलाही मोठा माणूस हा दिलदार असला पाहिजेअसे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच त्या पुढे म्हणल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यावेळी देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे पवार साहेबांवर टीका करायचे आणि याला तर खरी गंमत म्हणतात पण विरोधक तर असला पाहिजे आणि तोही दिलदार असला पाहिजे.अशी भूमिका त्यांनी मांडली.

तर समजेल माझ्या कामाचा वेग

भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन या बारामती दौर्‍यावर येत असल्याने सुप्रिया सुळे या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अमेठी जिंकली,आता बारामती जिंकू अस विधान भाजपचे नेते राम शिंदे यांनी केले आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझे आयुष्य अतिशय पारदर्शक असून मी मागील 13 वर्षापासुन बारामती लोकसभा मतदार संघाच लोकप्रतिनिधित्व करीत आहे. माझे फेसबुक,ट्विटर हे कोणी थोडासा वेळ काढून पाहिले तर समजेल माझ्या कामाचा वेग, देशातील अनेक जण मला फॉलो करतात अशा शब्दात भाजपचे नेते राम शिंदे यांना टोला लगावला.

हेही वाचा : स्मार्ट सिटीमधील खड्ड्यांविरुद्ध मनसेने केले असे काही कि…

केंद्रिय अर्थमंत्री माझ्या मतदारसंघात येत असल्याने खूप आनंद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदार संघात येणार असल्याने काय अपेक्षा आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझी दिल्ली येथे निर्मला सीतारामन यांच्या सोबत अनेक वेळा भेट होत राहते. मागील वेळेस देखील म्हणाले होते की,आपण जर या भागात येत असला तर आम्ही मनापासून तुमचे स्वागत करतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन माझ्या मतदारसंघात येत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच अरुण जेटली देखील बारामतीमध्ये आले होते. ते गोविंद बागेत राहिले होते. त्यावेळी देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. अरुण जेटली कृषी केंद्राला भेट दिली होती.त्यामुळे निर्मला सितारामन यांनी बारामती मतदार संघात अनेक संस्था चांगल्या काम करीत आहे त्या सर्वांना त्यांनी निश्चित भेट द्यावी आणि त्या पाहण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

दादा पालकमंत्री होता तेव्हा आठवड्याला बैठका व्हायच्या

दादा पालकमंत्री असताना दर आठवड्याला जिल्ह्यातील प्रश्ना बाबत आढावा बैठक होत होती. परंतु दुर्दैवाने मागील अडीच महिन्यापासून जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने आढावा बैठक होत नाही. खडकवासला भागात येणारा धायरी,वारजे परिसरात कचर्‍याचे ढीग वाढले आहेत.तर दुसर्‍या बाजूला पाणी कपात देखील सुरू केली आहे.अशा तक्रारी नागरिकांमार्फत येत आहे. आपल्या शहराला पाणी पुरवठा करणारी धरण पूर्ण भरली असताना पाणी कपात का होत आहे असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : एआरएआय’ तर्फे पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’ प्रसिद्ध

मला ‘त्या’ भाजपच्या कार्यकर्त्यांच वाईट वाटत

राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्ते नियुक्त्यांवरून नाराज आहेत. भाजपात जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, टॅलेंट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे.दौरा पहा किंवा पक्ष पहा,त्या पक्षामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तसेच दौर्‍यामधील परिस्थिती देखील तशीच आहे. लीड घेणारे लोक कोण आहेत.काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मधील आहेत. एखाद्या संस्थेमधून दुसर्‍या विचाराच्या संस्थेत जात असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.तिथे जाऊन पण त्यांना जबाबदारी मिळते.पण मला एकाच गोष्टीच वाईट वाटत की,ज्यावेळी संघर्षाचा काळ होता. तेव्हा भाषण देण्यापासून सतरंज्या उचलण्याच काम ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले. त्या लोकांचा कुठे ही मानसन्मान होत नाही. पंरतु बाहेरून आलेल्यांचा मानसन्मान खूप होतो. 50 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला.त्याच वाईट वाटत आहे.पण आमच्यातील टॅलेंट व्यक्तीला तिथे जाऊन काही मिळत असेल तर निश्चित आनंदाची गोष्ट असल्याच त्यांनी सांगितले.

रुपीचा बँकेच्या दोषी संचालकांवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका

नवाब भाईंना डावललं जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कार्यकारिणीमधून डावलण्यात आलं आहे का त्यावर त्या म्हणाल्या की,नवाब मलिक यांना अजिबात डावलण्यात आलेल नाही.माझे त्यांच्या मुलींशी रोज बोलणे होते. तसेच नवाब भाईना डावललं नाही आणि डावललं जाणार नाही.त्याच बरोबर अनिल देशमुख,नवाब मलिक,संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबत सतत मी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader