पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मतदार संघातील प्रश्ना बाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दसरा मेळाव्यावरून वाद सुरू झाला आहे या माध्यमांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, शरद पवार साहेब काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की,मुख्यमंत्री हे पद खूप मोठे असते. हे पद सर्वसमावेशक असले पाहिजे. तसेच आमच्या काळात देखील दसरा मेळावा होत होता. त्यावेळी आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरून दिलदारपणे भाषण होत असायची. आम्ही देखील भाषण उत्सुकतेने लाईव्ह पाहत असायचो की, आपल्या विरोधात काय बोलले आहेत. त्यामुळे मोठा नेता असतो ना तो नुसत्या पदाने मोठा होत नाही ,तो कर्तुत्ववाने मोठा होतो. राजा किंवा कुठलाही मोठा माणूस हा दिलदार असला पाहिजेअसे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच त्या पुढे म्हणल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यावेळी देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे पवार साहेबांवर टीका करायचे आणि याला तर खरी गंमत म्हणतात पण विरोधक तर असला पाहिजे आणि तोही दिलदार असला पाहिजे.अशी भूमिका त्यांनी मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा