पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. परंतु, मोशी येथील फलकावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला आहे. विठ्ठलापेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रविकांत वरपे यांनी ट्वीट केलं असून भाजपाने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केल आहे. 

देहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु , फलकावर विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Pankaja Munde And Devedra Fadnavis Meeting At Mumbai.
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, “खास…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”

पंतप्रधानांचा देहू दौरा; मोदी बनणार वारकरी, माथी सजणार तुकारामांची पगडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्वीट करत हा वारकऱ्यांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. भाजपाने जाणीवपूर्वक पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा दाखविला आहे, परंतु विठ्ठलापेक्षा कोणीही मोठं नाही अस रविकांत वरपे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

“विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोदींना पगडी आणि उपरणे भेट

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधानांचे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या उपरण्याने स्वागत केलं जाणार आहे. देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही तुकाराम डिझायनर पगडी साकारली आहे.

या पगडीबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीकरीता पगडी, फेटे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

Story img Loader