राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्हय़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सध्याची राजकीय आणि स्थानिक परिस्थिती याबाबत स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते यांची मते या बैठकीत जाणून घेण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Video-2023-01-05-at-11.13.12.mp4
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Video-2023-01-05-at-11.13.11.mp4

पवार साहेब कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या कमिटयावर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही, तसेच साहेब पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली एक हाती सत्ता येईल, त्याच बरोबर जिल्हय़ातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब तालुक्यामधून शहरात जात आहे, त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे, हे लक्षात घेऊन नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, यासह असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढाच पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर वाचवून दाखविला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp party workers read the complaints before sharad pawar in pune meeting svk 88 asj