पुणे : देशात लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून राज्यात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा वाटपाबाबत केवळ चर्चा आणि बैठका सुरू आहेत. त्या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यातील अनेक भागातील कार्यकर्ते भेटण्यास येत आहे.
हेही वाचा : होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्स्प्रेस
त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार म्हणाले की, मी आजवर १४ निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुका जिंकल्या देखील आहेत. त्यानंतर मी चार वर्षांपूर्वीच जाहीर केले की, यापुढे निवडणुका लढवायच्या नाहीत. मात्र असे असताना देखील आपण याही वेळी माढा, सातारा किंवा पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.