पिंपरीः पिंपरी-चिंचवडकरांवर गेल्या तीन वर्षांपासून सक्तीने पाणीकपात लादण्यात आली असून, दिवसाआड पाणी हे भाजपचे पाप आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या मोशी येथील मेळाव्यात ते बोलत होते. विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, रवीकांत वर्पे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, कविता आल्हाट, मयूर कलाटे, राहुल भोसले, श्याम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, विनायक रणसुभे, राजेंद्र जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : अजित पवारांचेही ‘मी पुन्हा येईन’; ‘पण कोणत्या पक्षाकडून?’ चंद्रकांत पाटलांकडून खिल्ली
गव्हाणे म्हणाले की, धरणात पुरेसा पाण्याचा साठा व शहरात नियमितपणे मुबलक पाऊस पडत असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो, हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. नागरिकांच्या हक्काचे पाणी पळवण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांच्या राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहरवासीयांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण अजित पवार यांचे कारभारावर नियंत्रण होते. मात्र, भाजप नेत्यांवर पाचही वर्षे कोणाचेही नियंत्रण नव्हते, त्यामुळे पालिकेने गैरकारभाराचा कळस गाठला. राष्ट्रवादीने प्रयत्नपूर्वक शहरविकासाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. भाजपच्या काळात शहरातील विकास ठप्प झाला.
विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले.