राज्यातील महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी (२३ ऑक्टोबर) चिंचवडला चापेकर चौकात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात वैशाली नागवडे, इम्रान शेख, वर्षा जगताप, शमीम पठाण , माया बारणे, सुप्रिया सोळंकुरे आदी सहभागी झाले होते.

गव्हाणे म्हणाले की, जनसामान्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी दिवाळी फराळाचे साहित्य रास्त भाव दुकानातून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मोठा गाजावाजा करून या योजनेची घोषणा करण्यात आली. मात्र अजूनही हा शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचू शकला नाही.