केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शाह पुणे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. अमित शाह यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची पायाभरणी करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. अमित शाहांच्या या दौऱ्यामुळे भाजपाला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल अशी आशा पक्षाला आहे. दौऱ्यासाठी अमित शाह यांचे फोटो असलेले मोठमोठे पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहकाराबाबत आम्हाला कुणी सल्ला देऊ नका!; अमित शहा यांचे सहकार परिषदेत टीकास्त्र

यादरम्यान मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्वीट केलं आहे. अमित शाह यांच्या मुक्कामाची गैरसोय होत असल्याने अजित पवारांनी सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट अमित शाह यांना दिल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. तसंच हेच आहेत शरद पवारांचे संस्कार असं सांगत कौतुक केलं आहे.

ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होत असल्याचं कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट माननीय अमित शाह यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिले आहे . हेच आहेत शरद पवार साहेबांचे संस्कार,” असं रुपाली ठोंबरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमित शहा यांचे सहकार परिषदेत टीकास्त्र

सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे अशी बोंब ठोकणाऱ्यांनीच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेत त्याचे खासगीकरण केले आहे. या क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना लगाम लावण्यासाठीच केंद्र सरकारने ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालय काढले आहे. त्यामुळे सहकाराच्या बाबतीत आम्हाला उगाच कुणी सल्ले देऊ नयेत, अशी उपरोधिक टीका केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली. याचवेळी सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बँकाच्या डबघाईला या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्याचा आरोपही शहा यांनी या वेळी केला. या सहकारी बँका वाचविण्यासाठी कुठलीही समिती न नेमता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट मदत घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रवरानगर येथे आयोजित सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यात शनिवारी शहा बोलत होते. अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rupali thombare patil tweet bjp home minister amit shah ajit pawar sharad pawar sgy