पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाचा राजीनामा देऊन आज शरद पवार गटात प्रवेश केला. अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून काही तास उलटले आहेत. असं असताना भोसरी विधानसभेवरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. सुलभा उबाळे यांनी नाराजी व्यक्त करत भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटालाच सोडण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्या स्वतः भोसरी विधानसभेतून इच्छुक आहेत. यावर शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडीमधून जो उमेदवार दिला जाईल त्यांचं आम्ही काम करू अशी भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाला राम राम ठोकला आहे. आज सकाळी २५ ते ३० जणांसोबत अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. अवघ्या काही तासातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी गव्हाणे यांच्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचं काम करणारे अजित गव्हाणे यांना शरद पवार गटात घेतल्याने त्या नाराज आहेत.

हेही वाचा…पुण्यातील शरद पवार गटातील नेत्याच्या मुलाने भरधाव कार चालवून टेम्पोला दिली धडक

अजित गव्हाणे यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम केलं होतं. हे सर्व माहीत असताना देखील शरद पवार गटाने त्यांना प्रवेश दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी दुखावले गेले आहेत. सुलभा उबाळे या गेल्या कित्येक महिन्यांपासून भोसरी विधानसभेची तयारी करत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळावा याबाबत त्या आग्रही आहेत. परंतु, अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने भोसरी विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होऊ शकतो, कारण अजित गव्हाणे देखील भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षित विकास न झाल्याने शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीतून कुठल्याही नेत्याला उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचं काम करू अशी भूमिका अजित गव्हाणे यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभेत कुठला उमेदवार द्यायचा हे अद्याप ठरलेलं नाही. असं देखील अधोरेखित केल आहे.

हेही वाचा…पुणे : अवघ्या नऊ वर्षांचा चिमुरडा जाताना चार जणांना जीवदान देऊन गेला…

खासदार अमोल कोल्हे यांचा भोसरीमधील जनता दरबार रद्द!

शरद पवार गटात अजित गव्हाणे यांना एंट्री मिळाल्यानंतर अमोल कोल्हे हे देखील नाराज असल्याचे बोलत जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे हे शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात होते. अजित गव्हाणे हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असल्याने त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम केले होत. याची सल अद्यापही कोल्हे यांच्या मनात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा उद्याचा जनता दरबार रद्द केल्याचे बोलले जात आहे.