पिंपरी : पिंपरी पालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने प्रचंड लूट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना केला.शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गानगरयेथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी महापौर मंगल कदम, अपर्णा डोके, नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, वैशाली काळभोर, कविता आल्हाट, राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, अरुण बोराडे आदी उपस्थित होते. बैठकीत राजेंद्र जगताप, शशीकिरण गवळी, मनोज माछरे, उदय पाटील, काशिनाथ जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा : पुणे : मेट्रो भुयारी मार्गात रूळ टाकण्याच्या कामांना वेग ; लवकरच प्रत्यक्ष चाचणी होणार
गव्हाणे म्हणाले, भाजपने भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची घोषणा करून पिंपरी पालिकेची सत्ता मिळवली. प्रत्यक्षात पाच वर्षात भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. पालिका लुटण्याचा विक्रमच भाजपने प्रस्थापित केला. आगामी निवडणुकीत भाजपचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात १५ वर्षे सत्ता होती. तेव्हा राष्ट्रवादीने शहराचा कायापालट केला, याविषयी जनतेत जागृती केली पाहिजे. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. ज्योती तापकीर यांनी आभार मानले.