(

पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार आघाडीवर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमावर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

हेही वाचा >>> “स्वाभिमानी, सुजाण मतदारांचा काम आणि निष्ठेला कौल”, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीची भावना

जगताप यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात सिंम्बा चित्रपटातील एक दृश्य असून, जगताप यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे प्रचारावेळी फिरत असतानाची दृश्ये आहेत. सिम्बा चित्रपटात रणवीर सिंगचा डायलॉग त्यात असून, अख्खा पब्लिक को मालून है कौन आणेवाला हे, तेरेकोच मालूम नही, असा संवाद आहे. या पोस्टमध्ये जगताप यांनी म्हटले आहे की, निकाल पहिल्यापासूनच ठरलो होता आणि आज फक्त लिडची औपचारिकता!

हेही वाचा >>> Maval Lok Sabha Election 2024 Result Live मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी! केवळ औपचारिकता बाकी; विरोधकांना मतदारांनी जागा दाखवून दिली – श्रीरंग बारणे

लोकसभा निवडणुकीच्या निकालात पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाल्याचे चित्र पहिल्या काही फेऱ्यांतून पुढे आले आहे. महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळमधील श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. सुळे आणि डॉ. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीपासून प्रतिस्पर्धी उमेदवार सुनेत्रा पवार यांना मागे टाकले. मात्र सुळे यांची आघाडी कमी जास्त होत असल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम राहिली आहे. शिरूरचे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर असून कोल्हे यांचे मताधिक्य १० हजारांपर्यंत पोहोचले आहे.

Story img Loader