पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत जगताप यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली असून, धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जगताप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी टीका केली. गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठविण्यात येत आहेत. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे. जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात अजित पवार पर्व सुरू’, शरद पवारांवर सुनील तटकरेंचा पलटवार

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती

मला गेल्या चार दिवसांपासून धमकीचा संदेश अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे. मी राजकीय परिस्थितीवर टीका केली, तसेच आंदोलन केल्याने मला धमकावले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणाऱ्यास अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad chandra pawar party city president prashant jagtap threatened pune print news rbk 25 ssb