पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठपैकी वडगाव शेरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट लढत होणार आहे. उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये अद्यापही महायुती, तसेच महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर न केल्याने येथे लढत कशी होणार याबाबत ‘सस्पेन्स’ कायम आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन दहापेक्षा अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र, पुणे शहरातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण उमेदवार असतील याची स्पष्टता अद्यापही आलेली नाही. शहरातील वडगाव शेरी आणि हडपसर मतदार संघातून विद्यमान आमदार असलेले सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांना महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने या मतदारसंघातून माजी आमदार बापू पठारे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ अशी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kothrud Vidhan Sabha Constituency BJP Chandrakant Patil will be in trouble Amol Balwadkar Rebellion Shisvena UBT Chandrakant Mokate MNS Kishor Shinde
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra assembly election 2024 Ajit Pawar NCP releases fourth list of 2 candidates
Ajit Pawar NCP 4th Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आणखी वाचा-नदी सुधार योजनेच्या यशासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत निर्णय

विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर भाजपने कोथरूडमधून मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील याची घोषणा झालेली नाही. कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र येथून महायुतीकडून कोण उमेदवार असेल यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही.

पुणे कॅन्टोन्मेंट, तसेच खडकवासला मतदारसंघातून महायुती, तसेच महाविकास आघाडीच्या वतीने कोणाला उमेदवारी जाहीर झालेली नाही. खडकवासलामधून मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे यांना, कोथरूडमधून माजी नगरसेवक किशोर शिंदे, तर हडपसरमधून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिली आहे. उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र मनसेने अद्यापही कोणाची उमेदवारी जाहीर केलेली नाही.

आणखी वाचा-लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोथरूडची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. तर पर्वतीची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला आणि शिवाजीनगर मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असल्याने एकाला उमेदवारी दिल्यास दुसरा इच्छुक नाराज होऊन बंडखोरी करेल, अशी भीती असल्याने या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व उमेदवार जाहीर होतील, असा दावादेखील महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत पेच कायम; मैत्रीपूर्ण लढत…

‘कसब्या’त आयत्यावेळी नवीन नाव?

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचा आमदार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. भाजपचे हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला. या मतदारसंघातून रासने यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक इच्छुक आहेत. मात्र, या मतदारसंघातून अखेरच्या क्षणी वेगळेच नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचीदेखील चर्चा असल्याचे बोलले जात आहे.